ठाणे: वज्रेश्वरी मंदिरात दरोडा घालणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ठोठावल्या बेड्या
फोटो सौजन्य - फाइल फोटो

ठाणे मधील भिवंडी तालुक्यात असलेल्या पुरातन वज्रेश्वरी देवी मंदिरात काही भामट्यांनी 10 मे रोजी दरोडा घातला होता. तसेच त्यांनी 10-12 लाख रुपयांची रक्कम लंपास केली असल्याचे सुद्धा सांगण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोठावल्या आहेत.

आरोपींना पोलिसांनी शहापूर परिसर, दादरा-नगर हवेली येथून अटक केली आहे. हे सर्व आरोपी ठाणे आणि पालघर मध्ये राहणारे असल्याचे पोलिसांच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या आरोपींकडून दोन लाख 83 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. तर अन्य तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.(Bhiwandi Vajreshwari Temple Theft: वज्रेश्वरी देवी मंदिरात चोरांचा डल्ला, दानपेटी लुटून काढला पळ)

तर चोरट्यांनी यावेळी मंदिराच्या एका सुरक्षा रक्षकाने मध्यस्थी केली असता त्याला बेदम मारहाण करून मंदिरातील इतर सुरक्षारक्षकांना बांधून ठेवलं. तसेच दानपेट्या फोडून सगळा माल चोरी केल्याचे सांगण्यात आले होते.