प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

नवं वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण गुरुवारी उत्साही होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे यंदाचा थर्टी फर्स्टचा आणि नवं वर्षाच्या स्वागत अत्यंत साधेपणाने साजरे करावे अशा आधीच सूचना दिल्या होत्या. तसेच महत्वाच्या ठिकाणांवर ही पोलीस तैनात करण्यात आले होते. याच पार्श्वभुमीवर ठाणे येथे दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यां 416 जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 200 सहप्रवाशांवर ही कारवाई केली गेली आहे.(नववर्ष 2021 निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जनतेसाठी पत्र; वैयक्तिक आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन)

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व जणांच्या विरोधात विविध आयपीएस कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकूण 623 जण दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे आढळून आले. त्यापैकी 416 जणांच्या विरोधात वाहतूकीच्या नियमांटचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केल्याचे डीसीपी बाळासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. त्यामधील 400 दुचाकी वाहने असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. एकूण 107 गुन्हे नारपोली वाहतूक विभागात दाखल करण्यात आल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.(New Year 2021: नव वर्षाची पूर्वसंध्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची करडी नजर; नाईट कर्फ्यू ते फटाकेबंदी या नियमांचं भान ठेवत स्वागत करा नवावर्षाचं!)

दरम्यान, मुंबईत सुद्धा ड्रिंक्स अॅन्ड ड्राइव्ह प्रकरणी 20 हून अधिक जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा हा आकडा कमी पहायला मिळाला आहे. तर यंदाचा थर्टी फर्स्ट नागरिकांनी घरातच बसून साजरा करणे पसंद केल्याचे दिसून आले. राज्य सरकाराने कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता येत्या 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागू केली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या दिवशी 4 हून अधिक जणांना एकत्रित फिरण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.