New Year 2021: नव वर्षाची पूर्वसंध्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची आज करडी नजर; नाईट कर्फ्यू ते फटाकेबंदी या नियमांचं भान ठेवत स्वागत करा नवावर्षाचं!
सध्या कोविड 19 चं संकट दाट असताना महाराष्ट् सरकारकडून आज विशेष खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलिसांची आज न्यू इयर सेलिब्रेशनवर करडी नजर असणार आहे.
नववर्ष 2021 च्या स्वागतासाठी आता सारं जग सज्ज झालं त्याचं काऊंटडाऊनदेखील सुरू झालं आहे. पण सध्या कोविड 19 चं संकट दाट असताना महाराष्ट् सरकारकडून आज विशेष खबरदारी घेतली आहे. मुंबई पोलिसांची (Mumbai Police) आज न्यू इयर सेलिब्रेशनवर (New Year Celebration) करडी नजर असणार आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज रात्री 11 नंतर सारी पब, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स बंद केली जाणार आहेत. तर नाईट कर्फ्यू लागू असल्याने सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकं एकत्र जमू शकणार नाहीत. किंबहुना मुंबईत नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला कुठेच गर्दी होऊ नये म्हणून पालिका प्रशासन, मुंबई पोलिस चोख सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत. दरम्यान आज 31 डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनबाबत नियमावली असली तरीही आनंदाने नव्या वर्षाचं घरच्या घरी स्वागत करण्यासाठी- ये-जा करण्यासाठी मुभा आहे. त्यामुळे जाणून घ्या नेमक्या मुंबई पोलिसांच्या आजच्या सेलिब्रेशनवर किती आणिकोणती बंधनं असतील? New Year 2021 Wishes In Marathi: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Messages WhatsApp, Facebook द्वारा शेअर करून खास करा नववर्षाचा पहिला दिवस.
31 डिसेंबरच्या रात्री नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला नेमक्या कोणत्या गोष्टींवर असतील बंधनं?
- मुंबई मध्ये आज (31 डिसेंबर) च्या रात्री 11 पासून पहाटे 6 वाजेपर्यंत कडक नाईट कर्फ्यू असेल. या काळात हॉटेल, नाईट क्लब, रूफ टॉप येथील पार्ट्या निषिद्ध असतील. नागरिकांना 11 नंतर येथे प्रवेशबंदी असेल. मुंबई मध्ये रात्री 11 नंतरही फूड डिलिव्हरीला परवानगी; BMC ची ट्विटद्वारे माहिती .
- मुंबई मध्ये नाईट कर्फ्यूच्या काळात सार्वजनिक ठिकाणी एकावेळेस 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही.
- रहिवासी इमारतीच्या टेरेसवर पार्ट्यांचं आयोजन करणार्यांवर ड्रोनची करडी नजर असेल.
- लाऊडस्पीकर, डीजे यांना मर्यादीत आवाजात चालू ठेवण्यास परवानगी असेल.
- कलम 144 अंतर्गत लागू करण्यात आलेल्या जमावबंदीचं उल्लंघन करणार्यांना कलम 188 च्या नियमानुसार शिक्षा होईल.
- पोलिस ऑफिशिएअल च्या माहितीनुसार, National Disaster Management Act च्या सेक्शन 51 अंतर्गत शिक्षा होईल.
- नातेवाईक, मित्र मंडळींना भेटण्यासाठी 11 च्या नंतर परवानगी असेल. मात्र चार चाकी गाड्यांमध्ये केवळ 4 व्यक्तींना परवानगी असेल.
- मुंबईमध्ये कुठेच मोठं सेलिब्रेशन नसेल. मात्र घराबाहेर पडल्यास तुम्हांला सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि फेसमास्क आवश्यक असेल.
- मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा मात्र या काळात नियमित सुरू ठेवल्या जाणार आहेत.
- मुंबई मध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी केली जाणार आहे. पोलिस कर्मचारी पीपीई कीट मध्ये ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह करणार्यांना रोखण्यासाठी सज्ज राहणार आहेत.
भारतासह देशभरात आज न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोना वायरसचं सावट पुन्हा गडद होण्याची चिन्हं असताना आरोग्याच्या दृष्टीने यंदा नियमावली कडक करण्यात आली आहे. नागरिकांनी त्याच पालन करण्याचं अवाहन देखील करण्यात आलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2020 09:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

