Food | Representational Image | ( फोटो सौजन्य - फेसबुक)

आज 31 डिसेंबर. नववर्षाची पूर्वसंध्या. आज संध्याकाळपासून थर्टी फर्स्ट पार्ट्यांना उधाण येईल. नववर्ष स्वागताची जय्यत तयारी सर्वत्र सुरु होईल. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदा जोरदार सेलिब्रेशन करता येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. कोविड-19 (Covid-19) चे संकट आणि त्यामुळे सरकार, पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेले नियम पाळणे अनिवार्य आहे. दरम्यान, नाईट कर्फ्यू (Night Curfew) असला तरी मुंबईकरांची पार्टी थांबू नये म्हणून पालिकेने चोख व्यवस्था केली आहे. रात्री 11 नंतरही फूड डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती BMC ने ट्विटद्वारे दिली आहे. हा निर्णय मुंबईकरांसाठी नक्कीच दिलासादायक आहे.

बीएमसी ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "मुंबई, रात्री 11 नंतर पार्टी संपवू नका, नूतन वर्षाचे स्वागत घरीच करा. आता उपहारगृहांना रात्री 11 नंतर घरपोच सेवा करण्याची अनुमती देण्यात आली आहे. मुंबईस सुरक्षितरित्या नवीन वर्षात पदार्पण करण्याकरिता कोरोनाविषयीच्या सर्व सुनिश्चित नियमांचे काटेकोरपणे पालन करा." त्यासोबतच #MyBMCUpdates, #NaToCorona आणि #StayHome हे हॅशटॅगही जोडले आहेत. (New Year 2021: नव वर्षाची पूर्वसंध्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची आज करडी नजर; नाईट कर्फ्यू ते फटाकेबंदी या नियमांचं भान ठेवत स्वागत करा नवावर्षाचं!)

BMC Tweet:

दरम्यान, ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या उत्साहात नियंत्रणात आलेला कोरोनाचा फैलाव वाढू नये तसंच कोविड-19 च्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर मुंबई सह राज्यातील पालिका हद्दीत 22 डिसेंबर पासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला. त्या नियमाची पुन्हा एकदा आठवण करुन देण्यासाठी बीएमसी कडून ट्विट करण्यात आले आहे. मात्र मुंबईकरांचा हिरमोड  होऊ नये म्हणून फूड डिलिव्हरी करण्यास रात्री 11 नंतरही मुभा देण्यात आली आहे.