New Year 2021 Wishes In Marathi: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Messages WhatsApp, Facebook  द्वारा शेअर करून खास करा नववर्षाचा पहिला दिवस
Happy New Year 2021| File Photo

Happy New Year 2021 Wishes In Marathi:  नवीन वर्षाची सुरूवात आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. आपल्यापैकी अनेक जण हॅप्पी न्यू ईयर (Happy New Year) चा जयघोष करत सरत्या वर्षाला ला टाटा-बायबाय करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज रात्री 12 वाजता वर्ष 2020 ला अलविदा म्हणत नव्या वर्षाचं म्हणजेच 2021 चं स्वागत केलं जाणार आहे. 2020 हे वर्ष अनेकांसाठी कठीण प्रसंग़ घेऊन आल्याने ते आपल्यापैकी कोणीच कधीच विसरू शकणार नाही. कोरोना वायरसचं मोठं आरोग्य संकट या वर्षाने दाखवल्याने त्यांचा आर्थिक स्तरापासून मानसिक आणि शारिरीक स्तरावर मोठा परिणाम झालेला पहायला मिळाला. पण या सार्‍या कटू आठवणी मागे सारून पुन्हा नव्याने सुरूवात करण्यासाठी आपण सारे सज्ज असताना नववर्षाच्या आगमनाचा सारा आनंद आज आपल्या प्रियजनांसोबत, नातेवाईकांसोबत, मित्र मंडळींसोबत सोशल मीडीयात व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) , इंस्टाग्राम(Instagram) , ट्वीटर (Twitter) यांच्या माध्यमातून शेअर करायला मूळीच विसरू नका. 2021 या नव्या वर्षाच्या शुभेच्छा (New Year Wishes) देऊन नववर्षाचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी लेटेस्टली मराठी टीमने बनवलेली ही खास मराठमोळी शुभेच्छापत्रं, मेसेजेस,GIFs, WhatsApp Status, Stickers, HD Images नक्की शेअर करा. Happy New Year 2021 Messages: येणाऱ्या वर्षाच्या स्वागताला खास मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून द्या नववर्षाच्या शुभेच्छा.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, चीन, रशिया मध्ये लस आली आसली तरीही धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे यंदाच्या न्यू ईयर सेलिब्रेशनवर सहाजिकच कोरोनाचं सावट आहे. मुंबई सह राज्यभरात आज नववर्ष सेलिब्रेट करताना घराबाहेर पडण्याऐवजी घरातल्या घरातच पार्ट्यांचं सेलिब्रेशन आणि आयोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Happy New Year 2021 Photos & Videos: न्यूजीलैंड मध्ये भव्यदिव्य आतिषबाजीने केले नववर्षाचे स्वागत, पाहा डोळ्यांचे पारण फेडणारा व्हिडिओ.

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

स्वागत नववर्षाचे

नव्या आशा अन आकांक्षाचे

सरत्या वर्षाला निरोप देत

दिवस येवो सुख, समृद्धीचे!

नूतन वर्षाभिनंदन

via GIPHY

Happy New Year 2021| File Photo

2021 नववर्षाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी न्यू इयर

Happy New Year 2021| File Photo

आरंभ नव्या वर्षाचा

होऊ दे अस्त सार्‍या अरिष्टांचा !

नववर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

Happy New Year 2021| File Photo

via GIPHY

Happy New Year 2021| File Photo

प्रसन्नतेचा साज लेवून

यावे 2021 हे नवेवर्ष

आपल्या आयुष्यामध्ये नांदावे

सुख, समाधान आणि हर्ष!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy New Year 2021| File Photo

गेले ते वर्ष गेला तो काळ

नवीन आशा आणि अपेक्षा घेऊन आले

2021 हे नवं सालं!

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी न्यू ईयर व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स 

तुम्हांला नव्या वर्षाच्या शुभेच्छा अगदीच अवघ्या एका क्लिकवर पाठवायच्या असतील तर व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सचादेखील पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. या स्टिकर्सच्या माध्यमातूनही तुम्ही नूतन वर्षाभिनंदाचे मेसेजेस सोशल मीडियामध्ये फॉर्वर्ड करू शकता.

सरत्या वर्षाला निरोप देताना सारेच कोविड 19 चं संकट कायमचं दूर होऊ दे आणि पुन्हा पहिल्या प्रमाणे सारं सुरळीत होवो! ही इच्छा व्यक्त करतील. त्यामुळे लेटेस्टली मराठी कडूनही वाचकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा! नवं वर्ष आनंददायी आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा.