Happy New Year 2021 Photos & Videos: न्यूजीलैंड मध्ये भव्यदिव्य आतिषबाजीने केले नववर्षाचे स्वागत, पाहा डोळ्यांचे पारण फेडणारा व्हिडिओ
New year in New Zealand (Photo Credits: Twitter)

भारतात नववर्ष (Happy New Year) सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले असले तरीही न्यूजीलैंडमध्ये (New Zealand)  2021 वर्षाचे आगमन झाले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी न्यूजीलैंडमध्ये जबरदस्त आतिषबाजी करण्यात आली. या आतिषबाजीसह येथील नागरिकांना एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी खूपच त्रासदायक गेले. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारख्या संकटामुळे जग पुरते हादरवून सोडले होते. त्यामुळे या काळ्या वर्षाला अलविदा करण्यासाठी न्यूजीलैंडमधील लोकांनी जय्यत तयारी केली होती. या आतिषबाजीने संपूर्ण आसमंत उजळून गेला होता. या आतिषबाजीचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

न्यूजीलैंड देश हा जगातील त्या देशांपैकी एक आहे जेथे सर्वात आधी नववर्षाचे स्वागत केले जाते. हा देश सिडनीपासून अगदी 2 तासांच्या अंतरावर आहे तेथे आणि त्याच्या आसपासच्या भागात देखील कोविड-19 चे कोणत्याही केसेस नाही. त्यामुळे येथे नववर्षाचे जश्न एकदम दिमाखात करण्यात आले.हेदेखील वाचा- Mocktails For New Year Celebration: नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा 'हे' मॉकटेल्स, Watch Videos

पाहा न्यूजीलैंडमधील नववर्षाच्या स्वागताचे व्हिडिओ आणि फोटोज

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओजमध्ये ऑकलैंडमध्ये जबरदस्त आकर्षक रोषणाई करण्यात आलेली पाहायला मिळाली. ज्यात काउंटडाऊनच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

हा अद्भूत नजारा पाहण्यासाठी अनेक लोक एकत्र जमा झाले होते. तेथे डोळ्यांचे पारणं फेडणारी ही आतिषबाजी पाहायला मिळाली. लोकांनीही या आतिषबाजीचा मनसोक्त आनंद घेतला.