Happy New Year 2021 Messages: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. 2020 हे साल यंदा जवळजवळ सर्वांसाठीच कठीण होते. कोरोना विषाणू महामारीने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले व त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान अजूनही अनेक लोक भोगत आहेत. मात्र आता येणारे नवे वर्ष 2021 (New Year 2021) कडून बऱ्याच सकारात्मक अपेक्षा आहेत. हे वर्ष सर्वांनाच सुखाचे, समाधानाचे, आरोग्याचे अशीच प्रार्थना सर्वांच्याच मनी आहे. 2020 मध्ये कोरोना आपत्तीने जो काही हाहाकार माजवला तो थोडा बाजूला ठेवून नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत.
एकीकडे नाव वर्षाचा उत्सव आणि शुभेच्छा देण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने नवीन वर्षाच्या स्वागतोत्सवाच्या निमित्ताने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी आहेत. अशात सरकारने लागू केलेले नियम पाळूनच यंदाची नवीन वर्षाची पार्टी करा. त्यासोबतच ज्यांना तुम्ही शारीरिकदृष्ट्या भेटू शकणार नाही अशांना खास मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, Messages, HD Images शेअर करून शुभेच्छा द्या.
दाखवून गत वर्षाला पाठ, चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट, आली ही सोनेरी पहाट!
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो
नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो,
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री चरणी प्रार्थना… नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
दुःख सारी विसरून जावू, सुख देवाच्या चरणी वाहू
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या खास शुभेच्छा, नव वर्षाच्या शुभदिनी…!
नूतन वर्षाभिनंदन!
दरम्यान, जगात पहिल्यांदा सामोआ आणि ख्रिसमस आयलँड/किरीबातीमध्ये नवीन वर्षे उजाडेल. येथे नवीन वर्षाची सुरुवात 31 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता होईल. यानंतर न्यूझीलंड, रशिया आणि ऑस्ट्रेलियामधील काही भागांत नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. आशियाई देशांबद्दल बोलायचे तर, सर्वात पहिल्यांदा नवीन वर्षाचे स्वागत दक्षिण कोरिया, जपानमध्ये केले जाईल. जपान आणि दक्षिण कोरियामध्ये भारताच्या वेळेनुसार 31 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता नवीन वर्ष सुरू होईल.
चीन, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळमध्येही भारताच्या आधी नवीन वर्षाचे स्वागत होईल. यूएस मायनर आऊटलाईंग (Minor Outlying Islands) बेटांमध्ये अमेरिकन सामोसा येथे सर्वात शेवटी म्हणजेच भारतीय वेळेनुसार 1 जानेवारी रोजी सायंकाळी 5: 35 वाजता नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल.