Thane: घोडबंदर येथे  मृत अवस्थेत सापडला 3 वर्षीय बिबट्याचा बछडा
Leopard Cubs | (Photo Credits: Partur Forest Department)

Thane: ठाणे येथील घोडबंदर येथे 3 वर्षीय बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी असे म्हटले की, रस्ता ओलांडताना या बछड्याला वाहनाची धडक लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा त्यांनी प्राथमिक अंदाज बांधला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आजूबाजूला असलेल्या घोडबंदर रोडवरील चेना खाडीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, बछड्याला ताब्यात घेतले. वनाधिकाऱ्यांच्या डेटानुसार, सी-40 बिबट्या हा तीन वर्षांचा होता.(कॉलेजमध्ये शिरलेल्या बिबट्याचा विद्यार्थ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद Watch Video)

वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बोरिवलीतील वाइल्डलाइफ हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. तेथे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर असे सांगण्यात आले की, बछडा हा उंचावरुन खाली कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. परंतु वनाधिकाऱ्यांना संशय आहे की, त्याला एका वाहनाने उडवले आहे.(Leopard Hunts Pet dog Viral Video: बिबट्याने शिकार केली कुत्र्याची, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)

तर काही दिवसांपूर्वी पनवेलमधील  वाकडी गावाजवळ एका चौकीदाराने दोन बिबटे (Leopard) दिसल्याचा दावा केल्यानंतर वनविभागाने  गस्त वाढवली होते. तसेच स्थानिक रहिवाशांना देखील  विनाकारण, विशेषतः रात्रीच्या वेळी फिरू नयेत असे आवाहन केले होते. तर ही बिबट्या फिरत असल्याची घटना सीसीटीव्ही फुटेज कैद झाली नव्हती. परंतु नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले होते.