Leopard Hunts Pet dog | (Photo Credit: Twitter)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बिबट्याचा (Leopard) आहे. एका बिबट्याने सोसायटीच्या गेटमधून आत प्रवेश केला आणि थेट पाळीव कुत्र्याची शिकार (Leopard Hunts Pet dog Viral Video) केली. बिबट्या शिकार करुनच थांबला नाही तर, त्याने तोंडात पकडलेल्या कुत्र्यासह सोसायटीच्या गेटवरुन झेप घेतली आणि बाहेर धूम ठोकली. अत्यंत धक्कादायक अशी ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, बिबट्याने शिकार केलेल्या कुत्रा हा पाळीव होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हडिओ आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान (Parveen Kaswan) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, सोसायटीच्या गेटजवळ एक पाळीव कुत्रा (Pet Dog) सोसायटीच्या आतल्या बाजूला उभा आहे. काही वेळातच तिथे एक बिबट्या येतो. बिबट्याला पाहून कुत्रा भुंकू लागतो. मात्र, बिबट्या थेट फाटकावर चढतो. बिबट्या गेटवर चढताच कुत्रा सोसायटीत आतल्या बाजूला धावतो. तोपर्यंत बिबट्या सोसायटीच्या आवारात फाटक ओलांडून आलेला असतो. पुढे काही सेंकंदातच बिबट्याने कुत्र्याला पंजाने घायाळ केले आणि तोंडात पकडले आणि त्याची शिकार केली. शिकार केलेला कुत्र्याला घेऊन बिबट्या फाटकाबाहेर जातानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद होते. (हेही वाचा, ऐकवे ते नवलच! कुत्र्याच्या वाढदिवसादिवशी खर्च केले तब्बल 11 लाख; लाइटिंग, ड्रोन शोसह साजरे झाले सेलिब्रेशन)

ट्विट

बिबट्याने केलेली कुत्र्याची शिकार सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून जोरदार व्हायरल होते आहे. सोशल मीडियवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की, आपण जंगली प्राण्यांचा वावर असलेल्या परिसरात राहात असाल तर सहाजिकच पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायला हवी. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, वन्य प्राणी नेहमीच पाळीव प्राण्यांची शिकार करतात.