Jogeshwari rada | X @Sena_Jogeshwari

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे मतदान अवघ्याकाही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशात प्रचार शिगेला पोहचलेला असताना ठाकरे गट ( Thackeray Camp) आणि शिंदे गट (Shinde Group) कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे. काल मध्यरात्री जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात (Jogeshwari East Assembly constituency) हा संघर्ष झाल्याचं पहायला मिळालं आहे. खासदार रविंद्र वायकर वस्तू वाटत असल्याचा कळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब वर त्याचा जाब विचारायला गेले असता शिवसैनिक एकमेकांना भिडल्याचं पहायला मिळालं आहे. दोन्ही गट एकमेकांच्या अंगावरगेल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान वायकरांच्या कार्यकर्त्यांनी गेटमधून दगडफेक केली आणि त्यानंतर मातोश्री क्लब बाहेर स्थिती तणावाची झाल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर, ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब देखील तेथे पोहचले. ठाकरे गटाने पोलिसांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. मातोश्री क्लबवर गुंड आहेत आणि अनेक ठिकाणी आचारसंहितेचं उल्लंघन करणार्‍या गोष्टी घडत असल्याने कारवाई व्हावी अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाकडून कार्यकर्ते शुटिंग करत होते, महिलांवर हात उचल्त होते असेही म्हणाले आहेत. त्यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.