Sindhudurg Rain: सिंधुदुर्गमध्ये मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदीत(Terekhol River) पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून,आळवाडी परिसरात पुराचे पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. आळवाडी येथे वाहने पाण्यात बुडाली आहे. बांदा दाणोली रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावर पाणी आले असून, माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तर, राजापूर येथे अर्जूना नदीला पूर आला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. धोक्याच्या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने राजापूर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे.
अर्जूना नदीच्या पुराचे पाणी राजापूर बाजारपेठेत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
अर्जूना नदीच्या पुराच्या पाण्याने कोदवली नदीचे पाणी अडवले आहे. त्यामुळे फणसवाडीतील रस्ता कोदवली नदीच्या पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद झाली आहे. राजापूर नगर परिषदेने धोकादायक झालेला वासुकाका पूल पावसाला सुरुवात होताच वाहतुकीसाठी बंद केलेला असल्यामुळे आंबेवाडी हर्डी परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोर जाव लागतयं