महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) 23 जानेवारी पहिले राज्यव्यापी अधिवेशन मुंबई (Mumbai) येथे पार पडले. दरम्यान, मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला असून पुढील काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, आमच्या आरत्यांच्या त्रास लोकांना होत नाही, मग नमाजचा त्रास लोकांना का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देत एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) म्हणाले होते की, राज ठाकरे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, त्यांच्या कानाला आता त्रास का होऊ लागला आहे? असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या विषयी बोलणे अडचणीचे ठरेल, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना दिला आहे.
बाळा नांदगावकर यांनी मनसे अधिकृत ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओत ते म्हणाले की, इम्जियाज जलील यांना खासदारकीची लॉटरी लागली आहे. तसेच एन्टरटेनर कोणाला म्हणता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या नादाला लागू नका. हवे असल्यास आबू आझमीला जाऊन विचारा असा सांगत बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे. तसेच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आंगराबाद येथे नाचले होते. त्यांना आम्ही नाच्या बोलू का? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांनी इम्तियाज जलील यांना विचारला आहे. हे देखील वाचा- 'आजपासून सामना बंद!' अग्रलेखावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर आक्रमक
मनसे यांचे अधिकृत ट्वीट-
"एमआयएमच्या नेत्यांनी तोंड सांभाळून बोलावं. राजसाहेबांबद्दल हिन दर्जाची टीका सहन केली जाणार नाही. पुन्हा हि आगळीक झाली तर #मनसेदणका निश्चित. तो दणका कसा असतो हे त्या अबू आझमीला विचारा..." - मनसे नेते @BalaNandgaonkar pic.twitter.com/TBtyK1UmjP
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 25, 2020
राज ठाकरे एन्टरटेनर असल्याचे सांगत आम्ही मनसेला घाबरत नाही, आजपर्यंत सगळ्यांनाचा शिंगावर घेतले आहे. त्यामुळे कुणालाही घाबरत नाही. असे विधान इम्तियाज जलील यांनी केले होते.