'आजपासून सामना बंद!' अग्रलेखावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर आक्रमक
MNS Flag (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र निवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) 23 जानेवारी रोजी मुंबई (Mumbai) येथे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. दरम्यान, मनसेने आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल केला असून पुढील काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर राजकारण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जोरदार टीका केली जात आहे. यावरुन मनसे उपाध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी थेट सामना बंद असे ट्वीट करत आक्रमक भुमिका घेतली आहे.

“मनसे प्रमुखांना त्यांचे मुद्दे माडंण्याचा आणि पुढे रेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण त्यांनी आज घेतलेल्या भूमिका आणि त्याच विषयावर पंधरा दिवसांपूर्वी मांडेलेली मते मेळ खात नाहीत. भाजपची शिवसेनाद्वेषाची मुळव्याध दुसऱ्या मार्गातून बाहेर येत आहे आणि हे त्यांचे खेळ जुनेच आहेत”, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे. यावर अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. 23 जानेवारी, 1989 रोजी ‘सामना’हे शिवसेनेचे मुखपत्र सुरु झाले. त्या दिवसापासून आजतागायत नियमित ‘सामना’ आमच्या घरी येत होता. पत्रकारांनी केलेली टीका आम्ही समजू शकतो, पण रडत राऊत जी आगपाखड आता करत आहेत त्याचा निषेध म्हणून आजपासून ‘सामना’ बंद बंद बंद-अमेय खोपकर, असे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले आहे. हे देखील वाचा- पक्षात कमी कार्यकर्ते असले तरी चालतील; मात्र, ते निष्ठावंत असले पाहिजेत- नितीन गडकरी

अमय खोपकर यांचे ट्वीट-

भारतात आलेल्या पाकिस्तानी आणि बांग्लादेशी मुस्लिमांना हाकलुन देणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी पक्षाला झेंडा बदलण्याची काही गरज आहे, ही गोष्ट अतिशय गंमतीशीर आहे, अशीही टीका शिवसेनेने केली होती.