Sushant Singh Rajput  Death प्रकरण सीबीआय कडे सोपावण्यावर मुंंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांंची प्रतिक्रिया वाचा
Mumbai Police Commissioner Parambir Singh On SSR Case (Photo Credits: File Image, ANI)

Sushant Singh Rajput Death Case:  अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यु (Sushant Singh Rajput Case) प्रकरणाचा तपास आता सीबीआय (CBI) कडे सोपावण्याचा निर्णय आज 19 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज ( बुधवार, 19 ऑगस्ट 2020) अंतिम निर्णय सुनावला आहे. यानंंतर मुंंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंंह (Parambir Singh) यांनी प्रतिक्रिया देत म्हंंटले की, एकदा आम्हाला ऑर्डर कॉपी मिळाल्यानंतर आम्ही त्याची तपासणी करू आणि पुढे काय करता येईल हे ठरवु. आम्हाला ऑर्डर कॉपी पाठविण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात आमच्या वकिलांना सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणात सीबीआयला पूर्ण सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणं योग्य नाही - संजय राऊत ;19 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

सुशांत सिंंह राजपुत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असेल , निर्णयानंंतर महाराष्ट्र सरकार आपली भुमिका स्पष्ट करेल अशा आशयाची प्रतिक्रिया काहीच वेळापुर्वी महाराष्ट्राचे गृहमंंत्री अनिल देशमुख यांंनी दिली होती. Sushant Singh Rajput Case: अभिनेत्री अंकिता लोखंडे ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास CBI कडे देण्याच्या आदेशावर केले 'हे' ट्वीट

ANI ट्विट

सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी सर्व पक्षकारांच्या बाजू न्यायालयाने ऐकून घेतल्यानंंतर 11 ऑगस्टलाच या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. ज्यावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाच्या आदेशनुसार न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्यासमोर सर्व पक्षकारांनी आपले म्हणने संक्षीप्त अहवालाद्वारे 13 ऑगस्टर्यंत न्यायालयाकडे सोपवले होते. या सर्व प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आपला निर्णय आज सकाळी 11 वाजता दिला आहे या निर्णयानंंतर सुशांंतसाठी न्याय मागणार्‍या फॅन्स पासुन नातेवाईकांंपर्यंत सर्वांंनी आनंंद व्यक्त केला आहे.