अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी, खासदार अरविंद सावंत यांनी घेतली महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट; 19 ऑगस्ट 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Bhakti Aghav
|
Aug 19, 2020 11:52 PM IST
भारताला कोरोना विषाणूने विळखा घातला असतानाचं आता देशावर आणखी एका संकटाचं सावटं असल्याचं समोर आलं आहे. भारतात स्वाइन फ्लू आजारदेखील झपाट्याने पसरू लागला आहे. भारतामध्ये जुलै अखेर स्वाइन फ्लूच्या 2,721 रुग्ण आढळून आले असून 44 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.
याशिवाय महाराष्ट्रात मंगळवारी 11 हजार 119 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 422 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 लाख 15 हजार 477 इतकी झाली. तसेच मुंबईमध्ये 931 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाची चिंता वाढली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, राज्यात पावसाने चांगलाचं जोर धरलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी 3 तलाव भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.