Supriya Sule (PC - Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस फूटल्याचा दावा अनेक लोक करत आहेत. राजकीय वर्तुळातही तशीच चर्चा सुरु आहे. मात्र, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र हे अद्यापही मान्य नाही. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सुळे म्हणाल्या, मी पुन्हा पुन्हा सांगतो की, राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट नाही. पक्षाच्या स्थापनेपासून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि आमचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. आमचे नऊ आमदार आणि दोन खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यासाठी आम्ही आधीच लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेसाठी नोटीस दिली आहे आणि उत्तराची प्रतीक्षा आहे.

ट्विट