डोंबिवली लोकल प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी; गर्दीचा मुद्दा थेट लोकसभेत
Supriya Sule (Photo Credits-Twitter)

मुंबई शहराची जण असणारी लोकल ट्रेन अनेकांसाठी मात्र मृत्यूचा सापळा ठरताना दिसते. याच लोकल रोज लाखो लोक प्रवास करतात तर काहींना आपले प्राण गमवावे लागतात. लोकलची वाढती गर्दी हे याचं प्रमुख कारण आहे. त्यातही प्रामुख्याने नेहमी उल्लेख केला जातो तो म्हणजे डोंबिवली रेल्वे स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा. डोंबिवलीकरांसाठी हा लोकलचा प्रवास कधीच सुखाचा ठरत नाही, कारण या स्तहनकापर्यंत पोहचेपर्यंत सर्व लोकल गाड्या या गर्दीने गच्च भरलेल्या असतात.

मात्र या गर्दीवर लवकरच काहीतरी मार्ग निघू शकेल असं म्हणायला हरकत नाही. कारण या डोंबिवलीच्या गर्दीचा विषय आता पोहोचला आहे चक्क लोकसभेपर्यंत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा विषय उपस्थित केला आहे. डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या तसेच डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात 'शरद पवार हे माझे बॉस, त्यामुळे बॉस इज ऑलवेज राईट'

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करताना लिहिले आहे की, "डोंबिवली लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या प्रमाणापेक्षा जास्त गर्दीचा तसेच लोकल उशिराने धावण्याचा मुद्दा नियम ३७७ अंतर्गत उपस्थित केला आहे. डोंबिवलीकडे जाणाऱ्या आणि डोंबिवली स्थानकातून सुटणाऱ्या लोकलची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी केंद्राकडे केली आहे”.