Maharashtra: महाराष्ट्रातील ठाणे शहरात (Thane City) मानवजातीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शहरात भटक्या कुत्र्याला (Stray Dog) जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, सिटीझन फॉर अॅनिमल प्रोटेक्शन फाउंडेशनच्या 20 वर्षीय सदस्याने राबोडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. (वाचा - Dog Rape: भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करणारा 'बाबुराव' पोलिसांच्या ताब्यात)
मंगळवारी संध्याकाळी मसानवाडा येथे तक्रारदाराला भटका कुत्रा जाळल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तो घटनास्थळी गेला आणि त्याने त्या कुत्राला अर्धजळलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्यांने कुत्र्याला तात्काळ पशू रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथेचं कुत्र्याचा मृत्यू झाला. (वाचा - Mumbai: मास्क घालण्यास नकार देवून पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीस मुलुंडमध्ये अटक)
भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 429 (गुरेढोरे मारहाण करणे किंवा पळवून नेणे इ.) आणि प्राणी प्रतिबंधक क्रौर्य प्रतिबंध कायद्यान्वये अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील असे प्रकार समोर आले आहेत.
दरम्यान, जानेवारी महिन्यात पुण्यातील पिंपळे गुरव भागात दोन कुत्र्यांना पोत्यात घालून जाळल्याची तसेच चार कुत्र्यांवर विषप्रयोग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सांगवी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.