वंदे भारत एक्सप्रेस (फोटो सौजन्य- ट्वीटर)

सिकंदराबादहून (Secunderabad) विशाखापट्टणमला (Visakhapatnam) जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसवर (Vande Bharat Express) अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी तेलंगणातील महबूबाबाद (Mahbubabad) जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) या प्रकरणाची दखल घेतली असून तपास सुरू आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे नुकसान किंवा खिडकीच्या काचा तुटल्याच्या प्रश्नावर अधिकारी म्हणाले, ट्रेन विशाखापट्टणमला पोहोचल्यावर त्याचे (नुकसान) मूल्यांकन केले जाईल. अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासाच्या आधारे सांगितले की, काही मुलांनी ट्रेनवर दगडफेक केली असावी असा संशय आहे. हेही वाचा  India's Costliest Apartment: मुंबईमध्ये घडला भारतामधील सर्वात महागड्या अपार्टमेंटचा सौदा; BK Goenka यांनी 240 कोटींना खरेदी केले घर

मात्र तपास सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून रेल्वे पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात वंदे भारतची अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच विशाखापट्टणमच्या रेल्वे यार्डमध्ये या ट्रेनच्या डब्यांवर दगडफेक करण्यात आली होती, ज्यामुळे खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 जानेवारी रोजी डिजिटल माध्यमातून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.