राज्यात वादळी पावसामुळे नागरिकांचे नुकसान, वीज पडून पाच जणांचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राज्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसात काही ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच रविवारी नाशिक, अहमदनगर,पुणे आणि जळगाव येथे पाऊस पडल्याने कांदा, ज्वारी, आंबा आणि उन्हाळी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चांदवड, दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. तर वीज पडून मृत्यू झालेल्यांमध्ये तीन विद्यार्थी, एक महिला आणि नगर येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. संगमनेर येथे वादळीपावसामुळे घराची भिंत पडून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचसोबत नेवारा येथे वीजसेवा ठप्प झाली असल्याकारणाने ती पूर्ववत करण्यासाठी खांबावर चढलेल्या कंत्राटी कामगाराचा सुध्दा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला.(दुष्काळग्रस्त बीड मधील धक्कादायक वास्तव! अनेकींना घ्यावा लागला 'गर्भाशय' काढून टाकण्याचा निर्णय)

तर कर्जत येथे ही विजेची तार तुटल्याने दोन बैलांचा मृत्यू आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत राज्यात फळबागांना मोठे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्याता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.