एमएसआरटीसी चे कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळत आहे. यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी पुन्हा संप करणार असल्याचं दिसत आहे. पगारवाढ, पदोन्नती यासोबतच काही आर्थिक मुद्द्यांवरून 11 सपटेंबरला एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचं चित्र आहे. आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषणाची हाक देणार आहे. जर सरकारने तोडगा काढला नाही तर 13 सप्टेंबर पासून प्रत्येक जिल्ह्यातील एसटी डेपो मध्ये कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार आहेत.
42% महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत मिळावा, मूळ वेतनात जाहीर झालेल्या 5000, 4000, 2500 मुळे सेवाज्येष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीसह व विद्यमान कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांचा वर्षभर मोफत फॅमिली पास द्यावा, जुलमी शिस्त व आवेदन कार्यपद्धती त्वरीत रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागील वर्षी देखील अशाच प्रकारे सणासुदीच्या काळात एसटी कर्मचारी संपावर गेले होते. यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. मात्र तेव्हा देण्यात आलेली काही आश्वासनं अजूनही पूर्ण झाली नसल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यमुळेच ते पुन्हा संपाच्या तयारीमध्ये आहेत. नक्की वाचा: ST Mahamandal: आता बस स्थानकांवर सुरु होणार मिनी थिएटर, एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक; एसटीचा चेहरा मोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न .
यंदा 19 सप्टेंबर दिवशी गणेश चतुर्थी आहे. घरात बाप्पाचं आगमन करण्यासाठी एकीकडे तयारी सुरू असताना एसटी कर्मचार्यांनी संप पुकारल्यास गावी जाणार्या अनेक चाकरमान्यांचा, प्रवाशांचा खोळंबा होऊ शकतो.