प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सांगली (Sangli)  मधील एक 40 वर्षाचा व्यक्ती तब्बल 23 वर्षांनी दहावी बोर्ड परिक्षेत पास झाला आहे. याबद्दल त्यांचे कौतुक केले जात असून बोर्ड परिक्षेत 57 टक्के गुण प्राप्त केले आहे. या गोष्टीमुळे त्यांच्या मुलांनासुद्धा फार आनंद झाला आहे.

राजेश पवार असे या व्यक्तीचे नाव आहे. आटपाडी तालुक्यातील झरे येथे राजेश राहत असून त्यांनी 1994 मध्ये त्यांनी दहावी बोर्ड परिक्षा दिली होती. परंतु त्यावेळी राजेश सहा विषयांपैकी एकाच विषयात उत्तीर्ण झाले होते. तसेच घराची परिस्थिती हालाखाची असल्याने त्यांनी नंतर पुन्हा दहावी बोर्डाची परिक्षा दिली नाही. मात्र यंदा 17 क्रमांकाचा फॉर्म भरुन राजेश यांनी  दहावी बोर्ड परिक्षा  दिली असून त्यांना मोठे यश प्राप्त झाले आहे.

(Maharashtra Board SSC Results 2019: महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल 77.10%; यंदाही मुलींची बाजी)

राजेश हे मुळचे सातारा जिल्ह्यातील हिंगणी गावातील आहे. मात्र कामासाठी सध्या ते झरे येथे राहण्यासाठी आले आहेत. राजेश यांची मुलगी आता 12 वीच्या सायन्स क्षेत्रात शिक्षण घेत असून त्यांना एक 9 वर्षाचा मुलगासुद्धा आहे. राजेश हे सध्या झरे येथे इलेक्ट्रकिन तसेच राजेश यांना दहावीच्या परिक्षेत यश मिळाल्याने खुप आनंद झाला असल्याचे म्हटले आहे.