Thane Crime News: सूने बद्दलचा राग मुलावर काढला, अंगावर फेकले उकळते पाणी, बदलापूर येथील घटना
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Thane Crime News: ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला सून आवडत नसल्यामुळे तीनं पोटच्या मुलासोबत असं काही केले ज्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आईने मुलाच्या अंगावर मिरची पावडर मिसळलेले उकळते पाणी ओतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.(हेही वाचा- महिलांनी व्यभिचार केल्यास त्यांना दगडाने ठेचून ठार मारले जाईल)

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील बदलापूर परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मोहन नावाच्या व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. मोहन कुटुंबासोबत वालावली गावात राहतो. नेहमी त्याच्या घरात कौटुंबिक विवाद होत असायचा. मोहनच्या आईला तिची सून आवडत नसल्याचं सांगितले जात आहे. सूनबाई आल्यानंतर सारखी भांडण होत असल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. त्यांच्या जमिनीवरून वाद होत असायचा.

सूनेविषयी आईला राग असल्याने तिखट मिक्स केलेल उकलले पाणी अंगावर फेकल्याचे सांगितले. मोहन आणि त्याच्या आईचे सुनेविषयी वाद झाले होते. या वादात त्यांनी मोहनवर पाणी फेकले. गरम पाणी फेकल्यामुळे पीडित गंभीर भाजला. त्यानंतर तो मोठ मोठ्याने ओरडू लागला. शेजारच्यांनी त्यांची घरी पाहिले तर मोहन हा वेदनांनी ओरडत असल्याचे दिसले. त्यांमुळे शेजारच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती पुढे पोलिसांना देण्यात आली आहे.