Nitin Raut On Coal: महाराष्ट्रातील काही प्लांट्समध्ये 1.5 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. काहींमध्ये 3 दिवसांचा आणि काहींमध्ये 6 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. वीज संकट दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. जलसंपदा मंत्र्यांना जलविद्युत निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यास सांगितले आहे, असं महाराष्ट्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं आहे.
कोयना धरणात 17 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, वीज निर्मितीसाठी दररोज 1 टीएमसीची गरज आहे. लोडशेडिंग सोडवायचे असेल तर कोळसा, पाणी आणि गॅसची गरज आहे. केंद्र सरकारसोबतच्या करारानुसार, ते राज्य सरकारला एपीएम गॅस उपलब्ध करून देण्यास पात्र आहेत, असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
Some plants in Maharashtra are left with 1.5-days of coal, some with 3 days & some others with 6 days of coal. State Govt is working to resolve power crisis. Water Resources Minister has been asked to supply water for hydroelectricity generation: Maharashtra Energy Min Nitin Raut pic.twitter.com/aWcLPBJsNi
— ANI (@ANI) April 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)