सोलापूरामध्ये (Solapur) एका माथेफिरु तरूणीने हैदोस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर स्टेशनच्या वेटिंग रूम (Solapur Station Waiting Room) मध्ये सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका लोखंडी रॉडने या तरूणीने काच फोडली. सार्या वेटिंग रूमच्या काचा फोडल्यानंतर तिने फुटलेल्या काचा उपस्थितांच्या दिशेने देखील भिरकावल्या. सुदैवाने या प्रकारामध्ये कुणाही अन्य प्रवाशाला गंभीर जखम झालेली नाही. पण त्या तरूणीच्या पायाला जखम झाली आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, या तरूणीचं नाव राजनंदिनी साठे आहे. ती कोणत्याही रेल्वे प्रवासासाठी वेटिंग रूम मध्ये नव्हती तर केवळ तेथे बसलेली होती. नेहमी प्रमाणे रेल्वे आल्यानंतर प्रवाशांची ये-जा सुरू होती अशामध्ये त्या महिलेला राग अनावर झाला आणि तिने काच फोडली. हा प्रकार पाहून घाबरलेल्या अवस्थेतच तेथे असलेल्या 5-6 जणांनी तिला पकडले. नंतर तिला रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. लोहमार्ग पोलिस ठाण्यात महिला कर्मचारी नसल्याने पुरूष पोलिसांनीच तिला पकडलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दिलेला चहा देखील या मुलीने भिरकावून लावला.
पहा सोलापूर स्थानकातील तरूणीचा हैदोस
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्टेशनवर एका वेड्या मुलीने वेटिंग रूम फोडली; पूर्ण प्लेटफार्मवर काचेचा पडला खच. #Solapur #IndianRailwayhttps://t.co/CbvSFUjpi9 pic.twitter.com/ausiqp5ySY
— Lokmat (@lokmat) October 21, 2022
पोलिसांकडून या तरूणी चौकशी केली जात आहे. तिच्या आई-वडिलांची, कुटुंब, नातेवाईकांपर्यंत पोहचण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.