Rats | Representational Image (Photo Credits: Pixabay)

शेतकऱ्याने देवासमोर लावलेला दिवा एका उंदराने (Rats) पळवला आणि मोठा अनर्थ घडला. शेतकऱ्याच्या घरासह संपूर्ण शेतातील ऊस (Sugarcane Fields), घरातील अडिच लाख रुपये रोख रक्कम, घरातील महत्त्वाची कागदपत्रं आणि इतरही दस्तऐवज जळून खाक झाला. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यात तालुक्यात असलेल्या मिरगव्हाण (Mirgavhan) गावात ही घटना  घडली. या शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे आता नेसत्या कपड्यांशीवाय आता काहीच शिल्लख उरले नाही. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की, आप्पा वायसे हे आपल्या कुटुंबासोबत मिरगव्हाण गावात राहतात. आपली पत्नी, वडील, भाऊ आणि मुले असा त्यांचा परिवार. शेतकरी कुटुंब. त्यामुळे सुरुवातीपासूनच घरात धार्मिक वातावरण. ही घटना घडली त्या दिवशी आप्पा वायसे यांच्या पत्नीचा उपवास होता. त्यामुळे त्यांनी शेतात जाण्यापूर्वी देवपूजा केली. देवासमोर दिवा लावला आणि सर्वजण मिळून शेतात गेले. (हेही वाचा, नागपूर: विहिरीत पडलेला उंदीर काढताना तिघांचा मृत्यू)

दुपारी सर्वजण शेतातून घरी परतत होते. तोवर घराच्या एका कोपऱ्यातून धूर येत असल्याचे दिसले. शेजाऱ्यांनीही आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून शेतात गेलेले आप्पा वायसे यांचे कुटुंबीय घराकडे धावत आले. पाहतात तर काय घराला आग लागलेली. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी घर विझविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले खरे. परंतू, आग आटोक्याबाहेर गेली. भर दुपारी घराची राखरांगोळी तर झाली. परंतू, घराशेजारच्या ऊसाच्या शेतालाही मोठी आग लागली. आणखी दुर्दैव असेही आप्पा वायसे यांच्या भावाच्या घरालाही आग लागली. हा एवढा सगळा अनर्थ देवासमोर लावलेली वात उंदराने पळवल्यामुळे झाला.

आप्पा वायसे यांचा सर्वात मोठा मुलगा मयूर वायसे याने नुकतीच विज्ञान शाखेत रसायनशास्त्र विषयात (Bsc Chemistry) पदवी घेतली आहे. तो सध्या स्पर्धा परीक्षेचा (MPSC ) अभ्यास करतो आहे. तर वायसे यांचा धाकटा मुलगा महेश याने झेरॉक्स सादर करुन Msc biotechnolog विषयाला प्रवेश घेतला आहे. आता त्याला प्रत्यक्ष शिक्षण घेताना सत्य कागदपत्रे दाखवावी लागणार आहेत. मात्र ही सर्वच कागदपत्रे जळून खाक झाल्याने मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. वायसे कुटुंबीयांकडे नेसत्या कपड्यांशीवाय आता काहीच शिल्लख उरले नाही. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.