शेतामधल्या विहिरीत (Well) पडलेले उंदीर (Rat) काढणे तिघा जणांच्या जीवावर बेतले. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मौदा (Mauda Tehsil) तालुक्यात असलेल्या वाकेश्वर परिसरात घडली. आकाश पंचबुद्धे, विनोद बर्वे आणि गणेश काळबांडे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. तिघांचीह वयं अनुक्रमे 27,37,28 वर्षे अशी आहेत. हे तिघेही शेतमजूर म्हणून काम करतात. वाकेश्वर येथील बद्रीनारायण सपाटे यांच्या शेतात हे सर्वजण काम करत होते. दरम्यान ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, बद्रीनारायण सपाटे यांच्या शेतात पिकांना खत देण्याचे काम सुरु होते. दरम्यान, दुपारच्या वेळी या तीन मजुरांपैकी एकाला विहिरीत उंदीर पडल्याचे दिसले. त्यांनी आणखी डोकावून पाहिले असता आणखी काही उंदीर दिसले. हे उंदीर बाहेर काढण्यासाठी या तिघांपैकी एकजण विहिरीत उतरला.
बद्रीनारायण सपाटे यांच्या शेतात धान पिकांना खत देण्यासाठी आकाश पंचबुद्धे, विनोद बर्वे आणि गणेश काळबांडे गेले होते. दुपारच्या सुमारास शेतातील विहिरीत उंदीर दिसल्यानं त्याला काढण्यासाठी एक मजूर विहिरीत उतरला. मात्र, बराच काळ झाला तरी तो बाहेर आला नाही. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी दुसरा मजूर विहिरीत उतरला परंतू तोही बाहेर आला नाही. त्यामुळे आत गेलेले दोघे बराच वेळ झाला तरी बाहेर का आले नाहीत? हे पाहण्यासाठी तिसरा मजूर विरिहीत उतरला. अखेर तिघेही बाहेर आले नाहीत. तिंघांचाही विरिहीतच मृत्यू झाला. (हेही वाचा, धक्कादायक! गोंदिया येथे पूजन करण्यापूर्वीच बाप-लेकासह 4 जणांचा नवीन बांधण्यात आलेल्या विहिरीत गुदमरून मृत्यू)
मजूरांचा विहिरीत मृत्यू झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. दरम्यान, पोलिसांनाही घटनेची माहिती कळली. पोलिसांनी गावाकऱ्यांच्या मदतीने तिन्ही मजूरांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. विहिरीत असलेल्या विषारी वायूमुळे तिन्ही मजूरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.