सोलापूर: बसला भीषण अपघात, बस जळून 13 प्रवासी जखमी
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

पुणे-सोलापूर (Pune-Solapur) राष्ट्रीय महामार्गावर बसला भीषण अपघात झाला असल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 13 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

तेलंगणा परिवहन महामंडळाची बस ट्रकवर आदळल्याने आज सकाळी 4 वाजता हा भीषण अपघात झाला. तसेच अपघात झाल्यानंतर बसने पेट घेत ती संपूर्ण जळून खाक झाली आहे. त्यामध्ये असलम सय्यद, अजमेर विको आणि रामय्या बोपेदी अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहे. या तिघांसह अन्य जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

(लहान मुलांच्या क्रिकेटमुळे कोल्हापूर मध्ये मोठी हाणामारी; दगडफेकीत 3 पोलिसांसह 9 जण जखमी Video)

तर बस मध्ये असणारे सर्व प्रवासी हे हैदराबाद येथील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अग्निशमन दलाकडून बसला लागलेली आग विझवण्यात आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.