Solapur Accident: साताऱ्यात टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असताना दरम्यान बार्शी- धाराशिव मार्गावरिल तांदुळवाडी येथे गुरुवारी एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत झालेले तिघे तरुण धाराशिव जिल्ह्यातील रहिवाशी होते. हे तिघे तरुण एसटी बसचा खाली चिरडून जागीच ठार झाले आहे. ते तिघे मित्र बाईक वरून बार्शीकडे निघाले दरम्यान अपघात झाला. (हेही वाचा- टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सातऱ्यातील घटना)
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे तिघा मित्रांचा अपघात झाला. कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अश्या तीन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. दुचाकी वरून हे तिघे जण बार्शीच्या दिशेने जात होते. दरम्यान दोघांच्या ही वाहनांची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, तिघे ही बसच्या खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास 50 फूटांपर्यंत फरफटत गेले.
घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील गावकरी मदतीसाठी धावून आले. त्यांनी बसमधील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला.