Representative Image (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून फसवणुकीचे रोज नवीन प्रकार समोर येऊ लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर पुण्यातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणीने डेटिंग अ‍ॅपवर (Dating Apps) बोगस प्रोफाईल तयार लाखो रुपये लुबाडल्याची माहिती समोर आली आहेत. तिने एक, दोन नव्हेतर चक्क सोळा तरूणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची लूट केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी संबंधित तरूणीला अटक केली असून तिच्याकडील लाखो रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

सायली काळे असे त्या तरूणीचे नाव असून ती पुण्यातील साधुवासवणी रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीतील रहिवाशी आहे. दरम्यान, सायली ही डेटींग अॅपद्वारे तरूणांशी ओळख वाढवायची. त्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडील दागिने लंपास करायची. लुटल्या गेलेल्या एका तरूणाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने सायली विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, सायली अत्यंत चालाख होती. तरूणांची फसवणूक केल्यानंतर ती डेटींग अॅपवरील आपले अकाऊंट डिलीट करायची. ज्यामुळे पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचायला अडचण येत होती. मात्र, पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत तिला जाळ्यात अडकवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायलीने आतापर्यंत एकूण 16 जणांची लूट केल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी केवळ चार जणांनीच तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, समाजात आपली बदनामी होईल, या भितीने इतर तरूणांनी तक्रार दाखल केली नाही. हे देखील वाचा- Solapur: सोलापूरच्या माळशिरस येथे प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू; संतापलेल्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

सरकारकडून सायबर गुन्हेगार क्राईमबाबत नेहमी नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा दिला जात आहे. तसेच मोबाईलवर आलेल्या कोणत्याही मॅसेजला बळी न पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज करुन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून अनेक लोक यामध्ये बळी ठरले आहेत. यामुळे अनेकांना लुबाडले गेले आहे. सायबर क्राईमच्या अशा विविध घटना समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांकडूनही याची दखल घेतली जात आहे.