Photo Credit- X

 Latur-Ausa Highway Accident: महाराष्ट्रातील लातूर - औसा महामार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद कार चालकाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत आई आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- चिंचपोकळी पुलावर टेम्पोने दिली 38 वर्षीय व्यक्तीला धडक; चालकाचे घटनास्थळावरून पलायन, पीडितेचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने बेदरकारपणे गाडी चालवत त्याने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून तिघे जण घरी जात होते. ही घटना २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडली. सादिख शेख आणि त्यांची पत्नी इकरा आणि त्यांची सहा वर्षाची मुलगी  नादिया दुचाकीवरून घरी जात होते त्यावेळीस हा अपघात घडला. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या समोरील दुचाकीला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी कार चालकावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सादिख शेख यांनी पोलिस ठाण्यात मद्यधुंद कार चालकाविरुध्दात गुन्हा दाखल केला. या अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतुक सेवा सुरळीत केली.