Mumbai Hit-and-Run: चिंचपोकळी पुलावर टेम्पोने दिली 38 वर्षीय व्यक्तीला धडक; चालकाचे घटनास्थळावरून पलायन, पीडितेचा मृत्यू
जखमी मयूर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Mumbai Hit-and-Run: मुंबईमधून पुन्हा एकदा हिट-अँड-रनचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील चिंचपोकळी पुलावर मयूर प्रदीप लाडीवाल (वय 38) या व्यक्तीला एका टेम्पोने धडक दिली. यानंतर टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. जखमी मयूर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर, आग्रीपाडा पोलिसांनी बीएनएस आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 281, 125 (बी), 106 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. (हेही वाचा: Pune Shocker: पुण्यातील लवळे-नांदे रोडवर कुटुंबावर 40 जणांचा हल्ला; रॉड, काठ्या, दगड घेऊन केला पाठलाग)
मुंबईमधून समोर आले हिट-अँड-रनचे प्रकरण-
Maharashtra | A tempo hit a man (Mayur Pradeep Ladiwal (age 38) on the Chinchpokli bridge in Mumbai and fled from the spot. The Injured was admitted to the nearby hospital where he died during treatment. Agripada police of Mumbai registered a case against an unknown person under…
— ANI (@ANI) October 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2024 03:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

