राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे खासगी निवासस्थान 'सिल्वर ओक' ( Silver Oak Attack) येथे एसटी कर्मचाऱ्यांनी केलेले आंदोलन आणि हल्ला प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे अशा प्रकारचे आंदोलन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाने पोलिसांना दिली होती. मात्र, असे असतानाही पोलीस गाफील राहिल्याची कबुली वळसे पाटील यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सरु आहे. हे प्रकरणही न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर फार काही बोलणे उचीत नाही. परंतू, या प्रकरणात दोषी लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. आणखीही काही लोकांवर कडक कारवाई केली जाईल, असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवा यांच्या निवस्थानी झालेल्या हल्ला प्रकरणात एसटी कर्मचारी आंदोलनाचा नेता अॅड. गुणरत्न सदावर्ते याला पोलिसांनी ताब्यत घेतले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाची आणखीही तपास सुरु असल्याचे वळसे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिल्वर ओकवर झालेल्या आंदोलनावेळी दगडफेक आणि चपलाही भिरकवण्यात आल्या होत्या. या संपूर्ण प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र भावना उमटल्या. राज्य सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाईस सुरुवात केली आहे. (हेही वाचा, Jayant Patil: ज्यांना सरकार पाडण्यात रस आहे त्यांनीच शरद पवारांच्या घरावर हल्ला केला - जंयत पाटील)
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, प्रकरणाची रितसर चौकशी सुरु आहे. ही चौकशीत अनेक गोष्टी पुढे येथील. ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्या न्यायालयासमोर ठवल्या जातील. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यातील बाबी उघड करणे फारसे योग्य नाही. मात्र, ही बाब खरी आहे की, गुप्तचर विभागाने पोलिसांना 4 एप्रिलला पाठवलेल्या पत्रात कळवले होते. तरीही पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही.