Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या दुस-या लाटेला आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटद्वारे केली आहे. मागील सात वर्षात ना महागाई कमी झाले, ना रोजगार उपलब्ध झाले असे सांगत मोदी सरकारने (Modi Government) जनतेचे एकही स्वप्न पूर्ण केले नाही असे नवाब मलिक आपल्या ट्विटद्वारे म्हणाले आहेत. तसेच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात देखील मोदी सरकार अयशस्वी ठरले आहेत असेही ते म्हणाले.

सात वर्षात महागाई कमी झाली नाही… पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत… लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाहीत… दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले, त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही… मोदींनी जी जी स्वप्ने दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही, अशी टीका मलिक यांनी केली आहे.हेदेखील वाचा- Lockdown In India: महाराष्ट्रासह कोणकोणत्या राज्यांत वाढला लॉकडाऊन? कुठे निर्बंद शिथील? घ्या जाणून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टर्म आणि केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी दुसऱ्या टर्ममध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत. वेळेत ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्यावरही योग्य निर्णय घेतला नसल्याने कोट्यवधी लोक कोरोना बाधित झाले. तर लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली, असं मलिक म्हणाले.

कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले. काही लोक बेरोजगार झाले. कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले. अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.