धक्कादायक! पती-पत्नीचे घरगुती भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाकडूनच जन्मदात्या पित्याची हत्या
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलानेच जन्मदात्या पित्याची हत्या (Son Killed His Father) केली आहे. ही घटना पुणे (Pune) शहरातील देहू गाव (Dehu Gaon) येथील माळवाडी (Malwadi) येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्या वडिलांना दारूचे व्यसन होते. तसेच दारुच्या पिऊन आल्यानंतर सतत आपल्या आईला मारहाण करायचे, याला वैतागून आरोपीने रागाच्या भरात शेजारी पडलेल्या लाकडी फळी वडिलांच्या डोक्यात घातली. यात आरोपीच्या वडिलांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात अश्चार्यजनक वातावरण निर्माण झाले आहे.

विराज येळवंडे असे 19 वर्षीय तरूणाचे नाव आहे. विराजला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विराजचे वडील संतोष येळवंडे यांनी दारूचे व्यसन होते. ते दररोज व्यसनपायी आपल्या पत्नीशी वाद घालायचे तसेच तिला सतत मारहाणही करायचे. या सगळ्यामुळे त्यांचा मुलगा विराज वैतागला होता. रविवारी मध्यरात्री संतोष आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. हे भांडण सोडवण्यासाठी विराजने मध्यस्ती केली. परंतु, त्याचे वडील त्याच्यासमोर आईला मारहाण करत असल्याचे त्याला सहन झाले नाही. यावर संतापलेल्या विरोजने जवळ पडलेली लाकडी फळी वडिलांच्या डोक्यात घातली. यात संतोष रक्तबंबाळ झाला. त्यांना शेजाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्या मृत घोषित केले. हे देखील वाचा- नाशिक: घोटी येथील कृषी प्रदर्शनात 20 जणांच्या टोळक्याकडून तरुणाची भोसकून हत्या

नुकतीच रत्नागिरी येथे सिगारेटचे दहा रुपये देण्यावरुन झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी वॉटमनची हत्या केल्याची खळबळजन घटना घडली होती. एका बिअर शॉपीचा तो वॉचमन होता. वॉचमनचा गळा चिरणाऱ्या आरोपीचे धक्कादायक CCTV फुटेजही व्हायरल झाले होते. ही घटना महाड तालुक्यातलल्या दासगाव भागत घडली. यात दासगाव मधल्या लीना कळमकर यांच्या देशी दारु आणि बिअर शॉपीमध्ये वॉचमन म्हणून असलेल्या दिलीप साळवी यांची अशी निर्घृण हत्या करण्यत आली होती.