Plumber Kills Contractor: अवघ्या 500 रुपयांसाठी एका मजुराकडून ठेकेदाराची हत्या; ठाणे येथील धक्कादायक घटना
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

अवघ्या पाचशे रुपयांसाठी एका मजुराने (Plumber) ठेकेदाराची (Contractor) हत्या (Murder) केल्याची माहिती उघडकीस आली आहे. ही घटना ठाणे (Thane) येथील इंदिरानगर मध्ये गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मजुराला अटक केली असून त्यच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मजूर आणि ठेकेदार नातेवाईक आहेत. अवघ्या पाचशे रुपयांसाठी मजुराने ठेकेदाराच्या डोक्यात नळाच्या अवजाराने दहा ते बारा घाव घालून निघृण हत्या केली आहे. या आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुरज सरोज असे मजुराचे तर, विजय राम उजागीर सरोज असे ठेकेदाराचे नाव आहे. सुरज हा गेल्या चार वर्षांपासून नळ दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराकडे काम करीत होता. मात्र, लॉकडाऊमध्ये काम नसल्यामुळे सुरज विजयकडे काम करत होता. दरम्यान, सुरजच्या कामाचे विजयकडे 12 हजार रुपये जमा झाले होते. तसेच विजयने पैसे दिले नव्हते. तसेच प्लंबिंग कामासाठी लागणारे साहित्यही ठेऊन घेतले होते. यामुळे उरलेली थकबाकी घेण्यासाठी सुरज विजयकडे गेला. त्यावेळी विजय पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी संपूर्ण थकबाकी देत नसशील तर किमान पाचशे रुपयाची मागणी केली. तेव्हा विजयने त्याला पाचशे रुपये तर, दिलेच नाही आणि सूरजला शिविगाळही केली आहे. याच रागातून सूरजने विजयच्या डोक्यावर पान्ह्याने अनेक घाव घालून त्याचे डोके फोडले. गंभीर जखमी झालेल्या विजयचा मृत्यू झाला. हे देखील वाचा- Kolhapur Accident: धक्कादायक! कोल्हापूर येथे मारुती कार आणि एस.टी बसमध्ये भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

सूरज परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, पोलीस उपनिरीक्षक रुपाली रत्ने, हवालदार खरात, पाटील, तायडे, महापुरे या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून पान्हा जप्त केला आहे.