Kolhapur Accident: धक्कादायक! कोल्हापूर येथे मारुती कार आणि एस.टी बसमध्ये भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मारुती कार (Car) आणि एस.टी बसमध्ये (S.T Bus) मध्ये  अपघात (Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूरच्या (Kolhapur) कळंबे बावडा रोडवर हा अपघात घडला आहे. या अपघात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाली आहे. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या असताना हा अपघात झाला. यामुळे गगनबावडा मार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळापासून विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माळवे कुटुंबियातील एकूण सात जण मारूती कारमधून गगनबावडा येथील नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी जात होते. दरम्यान, आज सकाळी साडेनऊच्या सुमारास कणकवली आगराची एसटी बस आणि त्यांच्या कारमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात करण दिपक माळवे (वय, 27), आक्काताई माळवे (वय, 65), संजय दिनक माळवे (43), पुजा माळवे (वय, 36)  यांचा जागीच मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! नागपूरमध्ये दगडाने डोके ठेचून गुंडाची हत्या; आरोपीला अटक

तसेच, एम एच 09 बी डब्ल्यू 4141 असा धडक दिलेल्या बसचा क्रमांक आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मारुती कार पुढच्या बाजूने पूर्णपणे बसच्या इंजिनमध्ये शिरल्याचे समजत आहे. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे घडला. यात नेमकी कोणाची चूक होती, याचाही शोध घेतला जात आहे. यासाठी आसपासचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जाणाची शक्यता आहे.