एका दिव्यांग महिलेवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या सात वर्षांपासून बेडवर असलेल्या 60 वर्षीय महिलेवर 22 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून उपनगर पोलीसांनी साहिल नाना आवारे याला अटक केली आहे. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये राहणाऱ्या एका 60 वर्षीय महिलेला सात वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता व तेव्हापासून ती बेडवर पडून होती.
ही महिला तिच्या भावासोबत राहत आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास महिलेचा भाऊ घरी नसताना आरोपीने घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. पीडितेने याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशी, बुधवारी सकाळी महिलेचा भाऊ तिला चहा देण्यासाठी गेला असता, पीडितेने आपल्या भावाला घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवून त्याला अटक केली. गेल्या काही दिवसांपासून आरोपी नशा करून पीडित महिलेच्या घराबाहेर फिरत असल्याचेही तपासात समोर आले आहे. (हेही वाचा: Andhra Pradesh High Court कडून बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी आणि तक्रारदार यांच्यात तडजोड करण्यास परवानगी)
दरम्यान, याआधी दक्षिण मुंबईतील एका सरकारी शाळेच्या आवारात एका तरुणाने पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरातून एका 15 वर्षीय मुलाला अटक केली. आरोपीने मुलीला आमिष दाखवून शाळेत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, परंतु मुलीने तिच्या घरी पोहोचून तिच्या पालकांना माहिती दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.