महाराष्ट्र: इंदापूरातील भवानीनगर येथे शिवशाही बसची बैलगाडीला जोरदार धडक, भीषण अपघातात 2 बैलांचा जागीच मृत्यू
Shivshahi Bus | (Photo Credits: MSRTC)

बारामती इंदापूर (Indapur) तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, आज पहाटेच्या सुमारास भवानीनगर येथे परेल-अकलूज शिवशाही बसने (Shivshahi Bus) बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत बैलगाडीला जुंपलेल्या 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला. तर या बैलगाडीत चालवणारा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बैलगाडी ऊसतोडणीच्या कामासाठी जात होती. मात्र वाटेतच हा भीषण अपघातामुळे दोन मुक्या जनावरांना जीव गमवावा लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की शिवशाही बस आणि बैलगाडीच्या धडकेत या बैलगाडीला जुंपलेल्या 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला.हेदेखील वाचा- Aurangabad Accident: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

महिन्याभरापूर्वी नांदेड येथील शिवशाही बसला भीषण अपघात (Shivshahi Bus Accident) झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ही घटना तेलंगाणा (Telangana) राज्यातील कामारेड्डी (Kamareddy) येथे घडली. या बसमध्ये वाहन चालक आणि वाहनवाहक यांच्यासह एकूण 38 प्रवासी होते. त्यापैकी 17 जण गंभीर झाले आहे.

जानेवारी महिन्यात असाच एक अपघात झाला होता. सातारा जिल्ह्यात कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात (Tempo Accident) झाला. या अपघातात 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला. कराड तालुक्यातील पाटण ढेबेवाडी येथे ही घटना घडली. सुदैवाने टेम्पो चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु, सहाशे कोंबड्याचा मृत्यू झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती.