Aaditya Thackeray (Photo Credits: Twitter)

शिवसेना युवासेना प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यंदाचा त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांनी येत्या 13 जूनला त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त हिंतचिंतकांनी जिथे कुठे असाल तेथूनच आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्याचे आवाहन एका भावनिक पत्राच्या माध्यमातून केले आहे. त्याचसोबत तमाम शिवसैनिक, मित्रमंडळी आणि सर्वांना आदित्य ठाकरे यांनी विनंत करत असे म्हटले आहे की, होर्डिंग्स, हार तुरे, केक यांचा खर्च टाळून तो खर्च तुम्ही कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांसाठी करा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्या. त्यानमुळे या दिवशी एक सत्कार्य होत याचा मला आनंद होईल असे ही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर मिशन बिगेन अगेन नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र नियमांचे पालन सुद्धा करण्यात यावे असे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पानल करुन प्रशासनाला सहाकार्य करत सर्वांनी कोरोनापासून काळजी घेण्याचे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच हे आवाहन वाढदिवसानिमित्त खरी भेट असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. (मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; यंदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन!)

देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यात 97 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. तर दिवसेंदिवस नवे रूग्ण आढळ्याच्या संख्येमध्येही वाढ होत आहे त्यामुळे ही राज्यासाठी मोठी चिंताजनक बाब आहे. सध्या राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता राजकीय, सांस्कृतिक सोहळ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहे. 30 जून पर्यंत राज्यात लॉकडाऊन लागू आहे.