Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook, File Photo)

विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2019) रणधुमाळी सुरु असताना पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेच्या (Shiv Sena) माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारली असताना बंडखोरी करणे, पक्षविरोधी कारवाया करणे आणि शिवसेना विरोधी प्रचार केल्याप्रकरणी शिवसेनेने ही कारवाई केली आहे. शिवसेनेच्या कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

तृप्ती सावंत या वांद्रे पूर्व मतदार संघाच्या शिवसेनेच्या माजी आमदार आहेत. मातोश्रीच्या अंगणातील अर्थात वांद्रे पूर्वमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. याशिवाय, घाटकोपर पश्चिम, कणकवली आदी ठिकाणीही बंडखोरी झालेली आहे. मात्र त्यांच्याविरोधात अद्याप कारवाई झालेली नसल्याने त्यांच्यासंदर्भात शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे. हे देखील वाचा- शिवसेनेकडून बंडखोरांना दणका; 14 जणांची पक्षातून हकालपट्टी.

शिवसेनेकडून बुधवारी तिकिट कापलेल्या पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या 14 जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार असून 24 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती विजय मिळवला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.