shivsena | (Photo Credit: File Photo)

विधानसभा निवडणूकीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेकडून (Shiv Sena) तिकिट कापलेल्या पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या 14 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील वांद्रे पूर्व, कल्याण पूर्व, वर्सोवा मधील बंडखोर नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निवडणूकीसाठी तिकिट न दिल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदावाराच्या विरोधात किंवा काही ठिकाणी युतीमधील मित्रपक्षाच्या उमेदवाराबाबत बंडखोरी केल्याने हकालपट्टी केली आहे. यामधील नांदेड, हदगाव, बुलढाणा येथून सुद्धा बंडखोरांना पक्षातून काढून टाकले आहे. नांदेड दक्षिण येथून प्रकाश कौडगे, हदगाव येथून बाबूराव कोहळीकर, सोलापूर मध्यमधून महेश कोठे, मोहोळ मधून मनोज शेजवळ, चोपडा मधील कैलास, इंदिरा पाटील. गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अण्णासाहेब माने व संतोष माने, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विजयराज शिंदे, सिंधुताई खेडेकर, अर्जुन दांडगे, चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनिरुद्ध रेडेकर, कोल्हापूर उत्तर मधील कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंगराज, हातकणंगलेमधील संदीप दबडे, सिंदखेडमधील शानाभाऊ सोनवणे, जिंतूरमधील राम पाटील, पाथरीमधील डॉ. संजय कच्छवे आणि केज विधानसभा मतदारसंघातील अॅड. विशाल होबळे यांचा समावेश आहे.(नाशिक शिवसेना पक्षात असंतोष, युतीला धक्का; 36 नगरसेवक, 350 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा)

मातोश्रीच्या अंगणातील अर्थात वांद्रे पूर्वमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याविरोधात विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी, कल्याण पूर्व भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे, वर्सोवामध्ये शिवसंग्रामच्या भारती लव्हेकर यांच्याविरोधात शिवसेना नगरसेविका राजुल पटेल आदींनी बंडखोरी केलेली आहे. याशिवाय, घाटकोपर पश्चिम, कणकवली आदी ठिकाणीही बंडखोरी झालेली आहे. मात्र त्यांच्याविरोधात अद्याप कारवाई झालेली नसल्याने त्यांच्यासंदर्भात शिवसेना काय भूमिका घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे.