निष्ठेची शपथ ते मोबाईल कॉल्सवर निर्बंध... पहा शिवसेना पक्षाने काय घातल्या आपल्या आमदारांवर अटी
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

आज शिवसेना पक्षातर्फे एक महत्त्वपूर्ण बैठक मातोश्री इथं बोलावण्यात आली होती. या बैठकीला स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित होते. पण या बैठकीत नक्की काय चर्चा झाली हे जरी गुलदस्त्यात असलं तरी निवडून आलेल्या आमदारांना मात्र पक्षाकडून अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.

सरकार स्थापन करण्यासाठी आता 2 दिवसांतून कमी काळ शिल्लक असल्याने, भाजपकडून शिवसेनेच्या आमदारांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणून या अटी शिवसेनेने आमदारांवर  घातल्या असल्याचे समजत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अचंबित करणाऱ्या गोष्टी शिवसेना आमदारांच्या बैठकीत झाल्या.

1. शिवसेनेच्या सर्व आमदारांना निष्ठेची शपथ देण्यात येणार असल्याचं कळतंय.

2. निष्ठेची शपथ घेतल्यानंतर शिवसेना आमदारांची रवानगी रंगशारदा येथे करण्यात आली.

3. प्रत्येक आमदाराची जबाबदारी ही त्याच्या विभागप्रमुखाकडे दिली गेली आहे व त्या त्या आमदारासोबत विभागप्रमुख आणि स्थानिक शिवसैनिक उपस्थित असणार आहेत.

4. आमदारांच्या प्रत्येक फोन कॉलवर विभागप्रमुखांचं लक्ष असणार आहे.

5. आमदार कोणासोबत बोलत आहेत व किती वेळ बोलत आहेत, याची माहिती मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना दिली जाणार.

घोडेबाजार रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा सावध पवित्रा, शिवसेना आमदार 'मातोश्री' जवळच्या हॉटेलमध्ये दाखल

भाजपला पुढील २ दिवसात बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यासाठी त्यांना 145 हा आकडा त्यांच्याकडे असल्याचे विधानसभेत सिद्ध करायचे आहे. परंतु त्यांच्या निवडून आलेल्या आमदारांची संख्या फक्त 105 आहे. म्हणून भाजप दुसऱ्या पक्षांतील आमदारांना पैशांचं अमिश देत आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न तर करणार नाही ना अशी भीती प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असली तरी अद्याप तरी शिवसेनेनेच यावर उपाय शोधला आहे.