छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल सोशल मीडियावर  आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इसमास शिवप्रेमींनी दिला चोप
जितेंद्र राऊत (PC - Twitter)

छत्रपती शिवाजी महाराज, (Chhatrapati Shivaji Maharaj) संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या इसमास शिवप्रेमींनी चांगलाच चोप दिला आहे. या व्यक्तीकडून सोशल मीडियावर वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात येत होता.

जितेंद्र राऊत असं या व्यक्तीचं नाव आहे. राऊत याने अनेकदा शिवाजी महाराज यांच्याविरोधात खालच्या भाषेत वक्तव्य केली आहेत. त्यामुळे शिवप्रेमींनी जितेंद्र राऊत याच्या विरोधात तक्रार केली होती. परंतु, तरीदेखील राऊत यांनी शिवरायांबद्दल लिखाण करण सोडलं नाही. (हेही वाचा - CM Uddhav Thackeray on Coronavirus: मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर मध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी कंपन्या 31 मार्च पर्यंत राहणार बंद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

या सर्व प्रकारानंतर शिवप्रेमींनी जितेंद्र राऊत याला पकडून चोप दिला असून त्याच्या तोंडाल काळ फासत त्याची धिंड काढण्यात आली आहे. या प्रकरणी राऊत याला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. जितेंद्र राऊत याने शिवाजी महाराज यांना छत्रपती बोला पण औरंगजेब आणि अफजलखानाचा आदर करा, असं म्हटलं होतं. शिवाजी महाराजांमुळे जातीयता घट्ट झाली. मराठा, ब्राह्मण, कायस्थ सोडून इतर दारिद्री झाले, असंही जितेंद्र राऊत याने म्हटलं आहे. नितेश राणे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून जितेंद्र राऊत याचा तोंडाला काळ फासल्याचा फोटो शेअर केला आहे.