शिवसेना पक्षाचे संख्याबळ वाढले; बच्चू कडू, शंकरराव गडाख यांच्यासह 5 आमदारांनी दिला पाठिंबा
shivsena | (Photo Credit: File Photo)

नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ShivSena) पक्षाने 56 जागेवर विजय मिळवला आहे. त्याचबरोबर बच्चू कडू (Bacchu Kadu), शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्यासह 5 आमदारांनी शिवसेनेला अधिकृत पाठिंबा दिल्यामुळे पक्षाचे संख्याबळ वाढत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभेत भाजप- शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली आहे. मात्र, निकालानंतर दोन्ही पक्षात राजकीय वाद सुरु झाला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 45 आमदारांनी भाजपला पाठींबा देणार आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधान केले आहे. धक्कादायक म्हणजे, जागावाटप आणि सरकार स्थापनेबाबत चर्चा होताना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेनाही आपली ताकद वाढवण्याची तयारी करत आहे.

शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांची भेट घेतली आहे. दरम्यान, शंकरराव गडाख आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली आहे. त्यानंतर नार्वेकर यांनी शंकरराव गडाख यांना मातोश्रीवर घेवून आले. त्यावेळी शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला अधिकृत पाठिंबा देत असल्याचे पत्र उद्धव ठाकरे यांना दिले आहे. शंकरराव यांच्यासह बच्चू कडू, शेकापचे शामसुंदर शिंदे, रामटेकचे अपक्ष विजयी उमेदवार आशिष जैसवाल आणखी एका आमदाराने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ज्यामुळे शिवसेना पक्षाच्या संख्याबळाची आकडेवारी 61 वर जाऊन ठेपली आहे. हे देखील वाचा- पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना टोला

सध्या भाजप- शिवसेनाच्या युतीत वाद सुरु झाला आहे. दोन्हीही पक्ष आपली बाजू मजबूत करण्याचे प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.