पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना टोला
Devendra Fadnavis | (PTI)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे (National Congress Part) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वी साताऱ्यात (Satara) एक वादळी सभा घेतली होती. या सभेवेळी शरद पवार यांनी भरपावसात भिजून आपले भाषण केले होते. शरद पवार यांच्या या भुमिकेने राष्ट्रवादी पक्षाला मोठे यश मिळवले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीने यावेळी अधिक जागा जिंकल्या आहेत. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला असे बोलून शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

नुकतीच पार पडलेल्या विधासभा निवडणुकीत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. एवढेच नव्हे तर, राष्ट्रवादीने अधिक जागेवर विजय मिळवला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने 41 जागा मिळवल्या होत्या. परंतु, या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने तब्बल 54 जागेवर विजय मिळवला आहे. या विजयाला शरद पवार यांनी साताऱ्यात भिजत केलेले भाषण कारणीभूत आहे. असा विरोधकांचा दावा आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचारदरम्यान पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला, असे फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- आमचं ठरलंच नव्हतं; पाचही वर्षं मुख्यमंत्री भाजपचाच: देवेंद्र फडणवीस

सध्या भाजप-शिवसेना यांच्या युतीच्या वाद पेटला असून पाचही वर्षे मुख्यमंत्री हा भाजपचाच राहील आणि तो मी असेल. तसेच, पाचही वर्षे भाजप सरकार राज्यात स्थिर असेन असे वक्तव्य करत मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत कोणताही फॉर्म्यूला ठरला नसल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.