Dhanush Baan with Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण (Dhanush Baan) हे निवडणूक चिन्ह काही काळ गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज (15 नोव्हेंबर) सुनावणी पार पडत आहे. त्यामुळे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे मूळ चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा जाणार का? याबाबत उत्सुकता आहे.

धनुष्यबाण (Dhanush Baan) आणि शिवसेना हे पाठिमागील अनेक वर्षांचे समिकरण. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly by-election) त्याला छेद मिळाला. ठाकरे आणि शिंदे गटात उफाळून आलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हे दिली. शिवसेना हे मूळ नाव आणि या पक्षाचे धनुष्यबाण (bow and arrow ) हे निवडणूक चिन्ह (Shiv Sena Party Election Symbol) काही काळासाठी गोठवले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. याच याचिकेवर आज सुवावणी पार पडत असल्याने महाराष्ट्रभर उत्सुकता आहे. (हेही वाचा, Uddhav Thackeray Statement: केंद्रीय एजन्सी केंद्राच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहेत, उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा)

ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून परस्परांविरोधात याचिका दाखल झाल्याने निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण असे अनुक्रमे पक्षाचे नाव आणि चिन्हच गोठवले. परिणामी पक्षाचे नाव आणि चिन्ह पुन्हा वापरु द्यावे अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. उद्धव ठाकरे गटाने सोमवारी न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा वेळी चिन्ह गोठवण्याचा निर्णय कसा घेतला जाऊ शकतो, असा मुद्दा उपस्थीत करत जोरदार युक्तिवाद केला.