Aaditya Thackeray: शिवसेना कधीही इतरांसारखे लोककल्याणाच्या कामांमध्ये राजकारण करत नाही; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा विरोधी पक्षाला टोला
Aaditya Thackeray| Photo Credits: Twitter

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारणाने चांगलाच पेट घेतला असून विरोधकांकडून वारंवार महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi) टीका केली जात आहे. एवढेच नव्हेतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह त्यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनादेखील लक्ष्य केले जात आहे. यातच कल्याणच्या पत्री पुलाचे आज गर्डर लॉन्चिंग करण्यात आले होते. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना आणि पक्षाची नेतेमंडळी कधीही इतरांसारखे लोककल्याणाच्या कामांमध्ये राजकारण करत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

शिवसेनेसाठी राजकारण हे नेहमी निवडणुकांपुरते मर्यादित असते. एकदा निवडणुका संपल्या की, आम्ही सारे शिवसैनिक आपापल्या विभागातील लोककल्याणाच्या कामांना सुरूवात करतो. परंतु, काही लोक मुद्दाम अशा कामांमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांचे राजकारण करत राहू दे. पण शिवसेनेसाठी राजकारण हे केवळ निवडणुकांपर्यंतच मर्यादित आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी? राज्यातील शिक्षणसंस्थेबाबात झालेल्या गोंधळावरून आशिष शेलारांचा सरकाराला सवाल

 ट्विट-

कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम आज सुरुवात झाली आहे. आता पुढचे दोन दिवस हे काम चालणार आहे. या लाँचिंगच्या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.