विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर शिवसेना (Shiv Sena) पक्षाचा भाव चांगलाच वधारला आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन करायचे असले तर, शिवसेना पक्ष किंगमेकर असल्याने सत्ताधारी पक्षावर अंकूश ठेवण्याची संधी शिवसेनेला चालून आली आहे. त्यामुळे शिवसेना सध्या दबावाचे राजकरण करत असल्याचे चित्र आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या ट्विटर (Twitter) हँडलवरुन एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या चित्रातूनही संजय राऊत यांनी मित्रपक्षांना असाच काहीसा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. या चित्रामध्ये एक वाघ गळ्यात घड्याल अडकवून कमळाच्या फुलाचा सुगंध घेताना दिसत आहे. विधानसभा निवडणूक निकालात जनतेने दिलेला कौल विचारात घेताल हे चित्र मनोरंजक दिसत आहे. पण, चित्रातून ट्विटर युजर्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काहींनी हे चित्र पाहून महाराष्ट्राच्या जनतेने रेखाटलेले चित्र असेही म्हटले आहे.
संजय राऊत ट्विट
व्यंग चित्रकाराची कमाल!
बुरा न मानो दिवाली है.. pic.twitter.com/krj2QAnGmB
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 25, 2019
दरम्यान, काहींनी या चित्रावर अत्यंत मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. संदेश सावंत नावाच्या एका युजर्सने म्हटले आहे की, 'सांभाळून गंध घ्या. पटकन कामळातला भुंगा नाकात घुसेल.' तरस सोल ऑफ इंडिया नावाच्या एका युजर्सने म्हटले आहे की, नाही म्हणजे...खिशात राजीनामा ठेवला आहे असं पण दाखवलं असतं..बुरा न मानो दिवाली हैं.' (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल - सचिन सावंत)
ट्विट
सर..वाघाला एक खिसा दिला असता तर अजून बरं झालं असतं नाही का ??
नाही म्हणजे...खिशात राजीनामा ठेवला आहे असं पण दाखवलं असतं..
बुरा न मानो दिवाली हैं..☺️☺️
— Soul of India (@iamtssh) October 25, 2019
संदेश सामंत ट्विट
सांभाळून गंध घ्या. पटकन कामळातला भुंगा नाकात घुसेल.
— Sandesh Samant | संदेश सामंत (@sandesh_samant) October 25, 2019
विधानसभा निवडणूकीत भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 , काँग्रेस 44 आणि इतर पक्षांना 29 जागा मिळाल्या. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला. भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा सहज जिंकू असे म्हणत होते. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही तसा दावा केला जात होता. पण, जनतेने भाजपच्या दाव्याला टाचणी लावली. जनतेने युतीला पुन्हा सत्ता दिली. मात्र, विरोधकांनाही प्रबळ बनवले.