विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर आता सत्तास्थपानेचे वेध लागले आहेत. शिवसेना-महायुतीला बहुमत मिळाले असले तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात नवी समीकरणं जुळून येऊ शकतात. सचिन सावंत यांनी केलेल्या केलेल्या ट्वीट नुसार, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल. अशाप्रकारचे ट्वीट आशिष सावंत यांनी केल्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणूक निकालामध्ये शिवसेनेला 56, भाजपाला 105, राष्ट्रवादीला 54, कॉंग्रेसला 44 तर इतर 29 जागांवर आहेत. यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर 145 चा आकडा गाठण्यासाठी महराष्ट्रात नवी समीकरणं उदयाला येऊ शकतात. महाराष्ट्रात मताचा कौल युतीला पण तरीही सत्ता स्थापनासाठी हे 3 पर्याय
निवडणूक निकालानंतर काल उद्धव ठाकरे यांनी भाजपाकडे 50-50 फॉम्युल्यानुसार मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांची मागणी करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचं संकेत दिल्याने शिवसेनेच्या अपेक्षांना सुरूंग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेने ब्लॅक करून मुख्यमंत्रीपद मागितल्यास भाजपा त्यावर काय भूमिका घेतेय? यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत.
भाजपाला विधानसभेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता कॉंग्रेस पक्षानेही तयारी केली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊन ते सत्ता स्थपानेचं गणित जुळवू शकतात. त्यामुळे आता शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवदी एकत्र येऊन सत्तेचं गणित जुळवणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.